राजकीय भूकंप?? भाजपचे 7 आमदार काँग्रेसच्या संपर्कात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे तब्बल ७ आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच ते काँग्रेसमध्ये सामील होऊन शकतात असा मोठा दावा हिमाचल प्रदेश काँग्रेसचे आमदार सुखविंदर सिंग सुखू यांनी केला आहे. याशिवाय तीन अपक्षांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला असून हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सर्वात स्थिर सरकार असेल असेही ते म्हणाले.

सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र असून काँग्रेस फोडण्याची चर्चा निराधार आहे. काँग्रेसला ३ अपक्ष आमदारांचाही पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी सांगितलं.त्यामुळे काँग्रेसचे ४० आणि ३ अपक्ष असे एकूण आमदारांची संख्या ४३ झाली आहे. याशिवाय भविष्यात भाजपचे ६-७ आमदारही काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात असे म्हणत सुखविंदर सिंग सुखू यांनी भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.

सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचल प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात. शुक्रवारी शिमला येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या वन टू वन बैठकीत 15 हून अधिक आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, भाजपला जोरदार झटका देत हिमाचल प्रदेशात काँग्रेसने बाजी मारली. काँग्रेसने ४० जागा जिंकत सत्ता काबीज केली तर भाजपला २५ जागांवर समाधान मानावे लागले.