महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट होताना दिसते आहे. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्टपणे महायुतीला कौल दिल्याचे दिसते आहे. त्यातही भाजपला सर्वाधिक जागांवर यश मिळवता आले आहे. 2024 च्या विधानसभा निकालाचा भाजपच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा विजय म्हणावा लागेल. कारण यापूर्वी 2019 साली झालेल्या भाजपच्या विजयापेक्षा यंदाच्या निवडणुकांच्या विजयामध्ये भाजपचा वाटा हा अधिक राहिल्याचे दिसून येत आहे.
भाजपने तोडाला आपलाच रेकॉर्ड
आज दिनांक १२ वाजून 55 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारला 220 जागांवर आघाडी मिळालेली आहे. तर एकट्या भाजपाला 127 जागांवर आघाडी मिळालेली आहे. 2019 च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजपने 105 जागांवर विजय मिळवला होता तर यंदाच्या वर्षी हा रेकॉर्ड देखील भाजपकडून मोडला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला जनतेने प्रचंड बहुमत दिलय आणि विजयाच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे त्यामुळे भाजप मोठ्या मताधिक्याने आघाडीवर असल्याचा दिसताय.
कोणाला किती जागा
मुंबईत 36 जागांपैकी 16 जागांवर भाजप आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गट आठ जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट एका जागेवर पुढे आहे. तर काँग्रेस केवळ दोन जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना ठाकरे गट सात जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपला भोपळाही मुंबईमध्ये फोडता आलेला नाही.
दुसरीकडे कोकणाचा विचार करता कोकणातील 39 जागांपैकी 13 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर शिवसेना शिंदे गट 13 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत तर शिवसेना ठाकरे गट तीन आणि राष्ट्रवादी पवार गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहे. काँग्रेसला कोकणामध्ये वीजय मिळवता आलेला नाही.
पश्चिम महाराष्ट्रातील 58 जागांपैकी भाजप 20, शिवसेना शिंदे गट आठ, राष्ट्रवादी दहा जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसच्या शिवसेना ठाकरे घडतील आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सहा जागांवर आघाडीवर आहे.
मराठवाड्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास मराठवाड्यात जरांगे फॅक्टर हा पूर्णपणे फेल गेलेला दिसतोय. कारण मराठवाड्यात 46 जागांपैकी भाजपाला 15 जागांवर आघाडी मिळालेली आहे. शिवसेना शिंदे गट दहा जागांवर राष्ट्रवादी अवचित पवार गट दोन जागांवर पुढे आहे तर काँग्रेस सहा शिवसेना ठाकरे गट तीन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही.