भाजपा उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्याने 3 मुलांना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रामध्ये सध्या पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण सर्वाधिक चर्चेत आहे. परंतु आता पुन्हा एकदा हिट अॅण्ड रन प्रकरण (Hit and run case) घडले आहे. उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातील भाजपचे उमेदवार करण भूषण सिंह (Karan Bhushan Sing) यांच्या ताफ्याने तीन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये 2 मुलांचा मृत्यू झाला आहे तर 1 मुलगा गंभीर जखमी आहे. त्यामुळे आता घडलेल्या प्रकाराबाबत परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. यासह भाजपच्या संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप पक्षाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत करण भूषण सिंह यांना कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिले आहे. याचं करण भूषण सिंह यांच्या ताफ्याच्या वाहनाने 3 मुलांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे. यातील 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला असून तिसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात कर्नलगंज-हुजूरपूर मार्गावरील छायपुरवा गावाजवळ घडला आहे

या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यासह पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत लोक रस्त्यावर ही उतरले. त्यानंतर काही लोकांनी घटनास्थळी उभी असलेली फॉर्च्युनर कार जाळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याला संबंधित नातेवाईकांनी विरोध दर्शवला. मात्र पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या सर्व घटनेमुळे निर्माण झालेले परिस्थिती पाहता परिसरात पोलीस तैनाब करण्यात आले आहे.