भाजप शहराध्यक्षाची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीड मधून एक हादरवणारी बातमी समोर येत आहे. बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बियाणी यांनी असं पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणी यांनी आपल्या राहत्या घरीच स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. बियाणी यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. यांनतर त्यांना तातडीने शहरातील फिनिक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.

या संपूर्ण प्रकारांनंतर पोलिसांनी बियाणी यांच्या घराची पाहणी केली. या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे. बियाणी यांनी इतकं मोठं टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना ही माहिती कळताच त्या तत्काळ रुग्णालयात पोहोचल्या.