लोकांनी खोके घेतले म्हणता मग आम्ही काय मातोश्रीवर पुष्पगुच्छ घेऊन जायचो का?; राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “संजय राऊत खासदार झाले, हे माझंच पाप आहे. हा कुणामुळे खासदार झाला? नारायण राणे शिवसेनेत असताना कोणी शिवसेनेतून बाहेर जात होतं का? आणि आता दिवसाढवळ्या जात आहेत. शिवसेनेची आताची अवस्था प्रचंड वाईट आहे. 40 आमदार दिवसाढवळ्या निघून जातात. अन् खोके घेऊन आमदार गेल्याचं हे म्हणत आहेत. तुम्ही लोकांनी खोके घेतले म्हणता मग मातोश्रीवर आम्ही काय पुष्पगुच्छ घेऊन जायचो का? आम्ही कुठे कुठे काय काय पोहोचवले, मातोश्रीच्या कोणत्या मजल्यावर काय दिले हे आता सांगायला लावून नकोस, असा इशारा राणे यांनी राऊतांना दिला.

भांडूपमध्ये कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी राणे म्हणाले की, दुसरं एक पिल्लू फार फार बोलत होते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी लागल्यानंतर पिल्लू गप्प झाले. काय बोलतो? कशासाठी बोलतो? माणसं तरी ओळखता येतात का? असा सवाल राणेंनी आदित्य ठाकरेंना दिला.

यावेळी राणे पुढे म्हणाले की, संजय राऊत हे एक संपादक आहेत. एक संपादक असल्यामुळे त्यांनी चांगले लिहावे, आपले चांगले विचार मांडावेत. संजय राऊत हा खासदार आहे. ते माझंच पाप आहे. एकदा मला बाळासाहेब ठाकरे यांनी बोलावले होते. मी वरती गेलो. तेव्हा संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ बसलेले होते. मी बाळासाहेबांना नमस्कार केला.

तेव्हा मी विधीमंडळात विरोधी पक्षनेता होतो. मी त्यांना कशाला बोलावले असे विचारले. त्यांनी मला सांगितले की, आपल्याला संजय राऊतला खासदार बनवायचे आहे. उद्या त्याचा फॉर्म भरायचा आहे. त्याला घेऊन जा. खासदार कर. मी बाळासाहेब ठाकरे यांना आयुष्यात कधीही नाही म्हणालो नाही. मी सांगितलं हो करतो.