भाजप नेत्यांची AI आर्मी; फडणवीस, राणे, गडकरींसह ‘या’ नेत्यांच्या फोटोंची तुफान चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI च्या मदतीने अमित वानखेडे यांनी महाराष्ट्र्र भाजपमधील प्रमुख नेत्यांचे लष्करी गणवेशातील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, आशिष शेलार, नारायण राणे, पंकजा मुंडे, चित्रा वाघ अशा दिग्गज नेतेमंडळींचा समावेश आहे. अमित वानखेडे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचेही AI च्या माध्यमातून फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

Nitin Gadkari AI
Nitin Gadkari AI

नितीन गडकरी हे भाजपचे वरिष्ठ नेते असून केंद्रात मंत्री आहेत. देशात विकासात्म कामे करण्यात गडकरी आघाडीवर असून राजकारणातील अजातशत्रू असेही आपण त्यांना म्हणू शकतो. देशभरातील रस्ते तयार करण्यात गडकरी यांचा सिंहाचा वाटा आहे.

Raosaheb Danve AI
Raosaheb Danve AI

रावसाहेब दानवे हे सुद्धा केंद्रात रेल्वे राज्यमंत्री आहेत. जालनाचे खासदार असलेले रावसाहेब दानवे हे १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ ला लोकसभेवर निवडून गेलेले आहेत.

Devendra Fadnavis AI
Devendra Fadnavis AI

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र्र भाजपचे आधारस्तंभ आहेत. महाराष्ट्रातील नंबर १ चे नेते म्हणून फडणवीस ओळखले जात असून मोदी- शहांचा मोठा वरदहस्त त्यांच्यावर आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसच सबकुछ है असं म्हंटल ठरणार नाही.

Pankaja Munde AI
Pankaja Munde AI

गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या महाराष्ट्र भाजपमधील मोठं नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंकजा भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सतत सुरु असतात, परंतु आजही त्या भाजपमध्येच असून येत्या काळात त्यांना पक्षात मोठी जबाबदरी मिळू शकते.

Chandrashekhar Bawankule AI
Chandrashekhar Bawankule AI

चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. बावनकुळे हे सतत महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवताना आपल्याला दिसत असतात.

Udayanraje AI
Udayanraje AI

भाजप खासदार उदयनराजे भोसले हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. स्टाईल इज स्टाईल असा डायलॉग मारणारे उदयनराजे हे तरुण वर्गात चांगलेच प्रसिद्ध आहेत.

Narayan Rane AI
Narayan Rane AI

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नारायण राणे यांच्याकडे केंद्रात लघु, सूक्ष्म आणि माध्यम उद्योगाची जबाबदरी आहे. भाजपमध्ये ठाकरे परिवारावर बिन्दास्त पणे टीका करणारे कोणी असेल तर ते नारायण राणे असतात.

Radhakrishna Vikhe Patil AI
Radhakrishna Vikhe Patil AI

अहमदनगर मधील सहकार सम्राट म्हणून ओळखले जाणारे राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेत. राज्यात सध्या २ क्रमांकाचे नेते म्हणून विखे पाटलांकडे बघितलं जातंय. सध्या त्यांच्यावर अनेक मंत्रिपदाचा भार आहे.