भाजपकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पंकजा मुंडे, पियुष गोयल यांना संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपने महाराष्ट्रातील वीस नेत्यांना लोकसभा निवडणुकीत संधी देण्यात दिली आहे. ज्यात पंकजा मुंडे, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, हिना गावित, पियुष गोयल,मुरलीधर मोहोळ या नेत्यांचा समावेश आहे. या यादीनुसार खासदार पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर उत्तर मुंबईमधून केंद्रीय मंत्री यांना संधी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोणत्या उमेदवाराला संधी?

हिना गावित-नंदुरबार

सुभाष भामरे- धुळे

स्मिता वाघ- जळगाव

रक्षा निखिल खडसे-रावेर

अनुप धोत्रे- अकोला

रामदास चंद्रभानजी तडस- वर्धा

नितीन गडकरी-नागपूर

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर

प्रतापराव पाटील चिखलीकर- नांदेड

रावसाहेब दानवे- जालना

भारती प्रवीण पवार- दिंडोरी

कपिल पाटील- भिवंडी

पियुष गोयल- उत्तर मुंबई

मिहिर कोटेचा- मुंबई ईशान्य

मुरलीधर मोहोळ- पुणे

सुजय विखे- अहमदनगर

सुधाकर श्रृंगारे- लातूर

रणजितसिंह नाईक निंबाळकर- माढा

संजयकाका पाटील- सांगली

पंकजा मुंडे- बीड