सरकारमधील भाजप मंत्री म्हणतायत : संजय राठोड, बच्चू कडू आमचे नाहीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आमच्या भारतीय जनता पक्षात ज्यांच्यावर ठपका नसतो, त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. संजय राठोडांना घेण्याबाबतचा निर्णय त्याच्या पक्षाच्या निर्णय आहे. बच्चू कडू आमचे नाहीत त्यामुळे त्याबाबत मी बोलणार नाही, असे स्पष्टच शिंदे- भाजप सरकारमध्ये शपथ घेतलेले मंत्री आ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री सुरेश खाडे मिरजेला जात असताना कराड येथील पंकज हॉटेल येथे काही काळ थांबले होते. कराडच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी मंत्री श्री. खाडे यांचा सत्कार केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा संयोजक विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी,माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, झेडपी सदस्य सागर शिवदास,भटक्या विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील, भरत देसाई, उमेश शिंदे, भूषण जगताप,कराड शहर उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, सरचिटणीस प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष मुकुंद चरेगावकर, उपाध्यक्ष उमेश शिंदे, नितीन वास्के,अल्पसंख्याक आघाडी, अध्यक्ष नितीन शहा, महिला आघाडी सौ. अनघा कुलकर्णी, सौ. सारिका गावडे,सौ. राधिका पन्हाळे माजी नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे, सौ. सुमन बागडी, कामगार आघाडी विश्वनाथ फुटाणे, भूषण जगताप ,गणेश कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. सुरेश खाडे म्हणाले, महिलांना पुढील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले जाईल. अद्याप दुसरा टप्पा बाकी आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणार आहे. आमच्या पक्षात काही मागून मिळत नाही, दिले आहे त्याला न्याय द्यावा लागतो.