भाजप खासदाराकडून राहुल गांधींची तुलना रावणाशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राहुल आणि राम या नावांमध्ये ‘रा’ शब्द समान आहे. त्यामुळे रामाने दिलेल्या मानवतेवर राहुल गांधी काम करत आहेत असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलं होत. त्यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देताना राहुल गांधींची तुलना रावणाशी केली आहे. राहुल गांधी आणि रावणात बरेच साम्य आहे असेही ते म्हणाले.

रामाने उत्तरेपासून दक्षिणेकडे यात्रा केली होती. मात्र, राहुल गांधी दक्षिणेपासून उत्तरेकडे निघाले आहेत. म्हणजेच ते रावणाचं काम करत आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि रावणामध्ये बरंच साम्य आहे असं अनिल बोंडे यांनी म्हंटल. ज्या लोकांनी भारत तोडण्याची शपथ घेतली होती, त्यांच्या गळ्यात राहुल गांधी गळे घालत आहेत असं म्हणत बोंडे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले-

राहुल गांधी आणि राम या दोघांच्याही नावात ‘रा’ आहे हा काही योगायोग नाही. पण आम्ही राहुल गांधींची तुलना रामाशी करत नाही . राहुल लग्नही हे माणूस असून ते मानवतेसाठी काम करत आहेत असं नाना पटोले यांनी म्हंटल होत.