Wednesday, October 5, 2022

Buy now

भाजप खासदार हीना गावित यांच्या वाहनाला अपघात; खासगी रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार हीना गावित यांच्या वाहनाला अपघात झाल्याच्याही घटना रविवारी हि घडली. या अपघातात गावित यांच्यासह त्यांच्या कारमधील काही कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. गावित यांची कार दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. या अपघातानंतर गावित यांची कार एका झाडाला जाऊन धडकली.

याबाबात अधिक माहिती अशी की, खासदार गावित यांच्यासह कार्यकर्ते आणि दुचाकीवरील जखमी महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस असल्याने पूर्वसंध्येला मोटर सायकल रॅली निघत असतात. त्या मोटरसायकलच्या रॅलीच्या उद्घाटनासाठी शहरातील कोरीट नका येथे शुभारंभ होणार होता. त्यानंतर एका खाजगी पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी खासदार हिना गावित कार्यकर्त्यांसोबत जात होत्या. त्यावेळी शहरातील गुरव चौक येथे अचानक दुचाकीस्वारामध्ये आल्याने खासदार गावित यांची गाडी झाडावर आदळली. या अपघातात गावित यांच्यासह तीन कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

खा. डॉ. हिना गावित यांच्या गाडीचा अपघात झाल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्या नाकाच्या हाडावर लागल्याने फॅक्चर झाले असल्याची माहिती डॉक्‍टरांकडून देण्यात आली. गावित त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते सुभाष पाटील यांना पायाला दुखापत झाली आहे. तर महेंद्र पटेल यांच्या देखील हाताला झाला आहे. जीतू पाटील, प्रतिक जैन यांना किरकोळ दुखापत झाले आहे.