कॉंग्रेसमुळचं आम्ही चार – चार मुलांना जन्म दिला; भाजप खासदाराचे अजब विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारसह अनेक भाजपा नेते यासाठी आग्रही आहेत. याच संदर्भात भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते व गोरखपूर मतदार संघाचे भाजपचे विद्यमान खासदार रवी किशन यांनी अजब विधान केले. कॉंग्रेसने जर या आधी लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू केला असता तर आम्हाला चार -चार मुले झाली नसती. काँग्रेसमुळेच आम्ही मुले जन्माला घातली, असे किशन यांनी म्हंटले आहे.

रवी किशन यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अजब प्रकारचा दावाही केला. केंद्रात लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू होणार आहे. मला चार मुले आहेत. या चार मुलांचे पालन पोषण करताना किती कष्ट लागतात याचा मला अनुभव आहे. माझी पत्नी आधी सडपातळ होती. मात्र, दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तिची प्रकृती खराब होत गेली. मी त्यावेळी संघर्ष करत होतो. त्यामुळे नेहमीच शुटिंगमध्ये व्यस्त असायचो. त्यावेळी कोणतीही माहिती नव्हती, परंतु आता मी माझ्या पत्नीकडे पाहतो तेव्हा वाईट वाटते.

आम्हाला चार- चार मुले झाली ही चूक नाही. कॉंग्रेस सरकारने त्याचवेळी जनसंख्या नियंत्रण कायदा आणला असता तर आम्हाला चार मुले झाली नसती. या कायद्यासंदर्भात कॉंग्रेसने जनजागृती न केल्यानेच भाजपा हे विधेयक आणणार आहे, असेही रवी किशन यांनी म्हंटले.