महाराष्ट्रात भाजपाचा निवडणुकीत धुव्वा उडेल : आ. पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा धुव्वा उडेल. अंधेरी निवडणुकीत उभं राहता आले नाही. शिंदे- फडणवीस सरकारला निवडणुका घेता येत नाहीत. नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका का घेत नाहीत असा सवालही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवक काॅंग्रेस राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलमताई येडगे, प्रदेश सरचिटणीस प्रदीप जाधव, शहर अध्यक्ष ऋतुराज मोरे, कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, पाटण तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील, माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर, श्रीकांत मुळे, अशोकराव पाटील, फारूख पटवेकर, युवानेते राहूल चव्हाण आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/501836905390080

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नव्या सरकारला अद्याप मंत्रीमंडळ पूर्ण करता आले नाही. शिंदे- फडणवीस सरकारवर कोर्टाची टांगती तलवार आहे. तारीख पे तारीख नाही पडली तर 13 तारखेला काहीतरी फैसला होईल. पक्षांतर बंदी कायदा अंतर्गत घटनेच्या 10 व्या परिष्ठाचे उल्लंघन झालेलं आहे. त्यामुळे 43 पैकी 20 मंत्री फक्त कार्यरत आहेत. शिंदे- फडणवीस सरकारमधील अनेकजण सरकार पडेल या भितीमुळे मंत्री पदाची शपथ घ्यायला तयार नाहीत. तसेच जागा कमी आणि सरकारमध्ये इच्छुक जास्त आहेत. एवढेच नाहीतर विधान परिषदेच्या 12 जागा भरण्यासाठी यादी दिली जात नाही. या अस्थिर परिणामामुळे प्रशासनावर गंभीर परिणाम झाला आहे. सरकार राज्याबाहेरी लोक चालवत असल्याचा आरोपही श्री. चव्हाण यांनी केला आहे.

सीमावादाच्या प्रश्नावर बैठकीत चहा, बिस्किट खाल्ली अन् परत आले
शिंदे -फडणवीस सरकारवर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सीमावादावरून हल्लाबोल केला. आमचे दोन मंत्री व कर्नाटकातील दोन मंत्र्यांची बैठक झाली. काय झाले ते आम्हाला कळलेच नाही. केवळ गेले चहा, बिस्किट खाल्ली अन् परत आले.