व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भाजपाचे मिशन 2024 बारामती, पवारांचा गड उध्वस्त होईल : चंद्रशेखर बावनकुळे

बारामती | वित्तमंत्री व भाजपाच्या केंद्रीय नेत्या निर्मला सितारामन या बारामतीच्या पूर्णवेळ प्रभारी आहेत, पुढच्या 18 महिन्यात 6 महिन्यात येतील आणि प्रत्येक वेळेस 3 दिवस मुक्कामी असतील. आगामी 2024 च्या निवडणुकीत बारामती हा शरद पवारांचा गड उध्वस्त होईल, अन् येथे बारामतीचा खासदार हा भाजपाचा असेल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

बारामती दाैऱ्यावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी लोकसभा प्रवास योजना सुरू करण्यात आली आहे. आज बारामतीत 1 हजार कार्यकर्त्यांचा प्रवेश होत असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बारामतीत सध्या विकासाची काय परिस्थिती आहे. केंद्राच्या माध्यमातून काय करता येतील हे पाहिले जाईल. मागच्या अडीच वर्षात केंद्राने गरिब कल्याण योजना पाठविल्या होत्या, त्या राज्य सरकारने कशा राबविल्या, त्याचे आॅडिट होईल. राज्यातील 16 लोकसभा पहिल्या टप्यात आहेत. केवळ बारामती नव्हे तर पुढेही अनेक लोकसभा मतदार संघात अशाप्रकारे आॅडिट होईल. लोकसभा मतदार संघात गरिब कल्याण योजना पोहचल्या की नाही एवढाच या दाैऱ्याच मतीतार्थ आहे.

मोठ- मोठे गड उध्दवस्त होतील, बारामती मोठा गड नाही ः- बारामती हा गड उध्वस्त होईल, यात शंका नाही. यापेक्षाही अनेक मोठ- मोठे गड उध्वस्त होतील. त्यामुळे बारातमीचा पुढचा खासदार हा भाजपाचाच असेले. त्यासाठी केंद्रातील नेते कोण उमेदवार असेल ते ठरवतील. परंतु विजय हा भाजपाचाच होईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

देशात 400 पेक्षा अधिक तर राज्यात 45 पेक्षा अधिक लोकसभा जागा जिंकणार ः- राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थासह राज्यातील सर्व निवडणूका लढविल्या जातील. राज्यात 45 पेक्षा अधिक लोकसभा आणि 200 पेक्षा अधिक विधानसभा आगामी निवडणुकीत जिंकू यांचा आम्हांला विश्वास आहे. देशात अनेक गड उध्दवस्त झाले आहेत. देशात 400 पेक्षा अधिक जागा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप जिंकेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.