कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय संपादन केल्या बद्दल भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे जिलेबी वाटप करीत जल्लोष केला.
यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या गुजरात विधानसभा मधील विजय म्हणजे ऐतिहासिक विजय असून या विजयामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या मध्ये आणखी आत्मविश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली या ऐतिहासिक विजयाची नोंद झाली असून महाराष्ट्रातील भाजपा सुद्धा आगामी निवडणुकांमध्ये मोठे यश नक्की संपादन करेल.
यावेळी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, भाजपा कराड उत्तर तालुका अध्यक्ष महेश जाधव, माजी तालुकाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, वडोली गावचे सरपंच जालिंदर पवार, हजारमाचीचे सरपंच शिवाजीराव डुबल, विरवडे उपसरपंच सागर हाके, तळबीडचे सागर शिवदास, पैलवान नयन निकम, शहाजी मोहिते, अक्षय चव्हाण,शरद चव्हाण, वाघेरी गावचे याकूब पटेल, जयसिंग डांगे, भीमराव पाटोळे, नागेश मदने, भारत पिसाळ, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.