Black Circles Remedies | डोळ्याखालील डार्क सर्कल घालवण्यासाठी बटाट्याचा करा वापर; लगेच दिसून येईल रिझल्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Black Circles Remedies आजकाल कोणतेही वयोगटातील व्यक्ती असला, तरी या वयात अनेक लोकांना त्यांच्या त्वचेची संबंधित अनेक समस्या उद्भवतात. अगदी तरुणांना देखील त्वचेबाबत अनेक समस्या निर्माण होतात. यातील असे सगळ्यात मोठी समस्या म्हणजे डोळ्याखाली येणारे डार्क सर्कल. प्रत्येक वयोगटातील लोकांना आजकाल डार्क सर्कल यायला लागलेले आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतो. तरी देखील डार्क सर्कल काही जात नाही. त्याचप्रमाणे आपण डॉक्टरांची ट्रीटमेंट देखील घेतो. परंतु तरीदेखील तुमच्या डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळे काही नाही होत नाही. आज आपण या लेखांमध्ये डार्क सर्कल (Black Circles Remedies) दूर करण्याच्या काही पद्धती जाणून घेणार आहोत. बटाट्याचा रस हा तुमच्या त्वचेसाठी खूप लाभदायक असतो. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर येणारे डाग, डार्क सर्कल्स या गोष्टी दूर होतात. आता या बटाट्यापासून तुमच्या त्वचेला काय काय फायदे मिळतात, हे आपण पाहूया.

बटाट्यापासून त्वचेला होणारे फायदे | Black Circles Remedies

बटाट्यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते. बटाट्यामुळे तुमच्या त्वचेतील रंगद्रव्य बदलतात आणि त्वचेचा पोत सुधारतो. त्यामुळे बटाट्याच्या मदतीने टॅनिंग, डार्क सर्कल इत्यादी दूर करण्यासाठी मदत होतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा बटाट्याचा रस वापरल्यास, तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खूप चांगला बदल दिसेल. आता कशाप्रकारे बटाट्याचा वापर करावा या गोष्टी आपण पाहणार आहोत.

पहिली पद्धत

तुमच्या डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे (Black Circles Remedies) किंवा डोळ्यांवरची सूज कमी करण्यासाठी तुम्ही तीन चमचे बटाटा रस घ्या. त्यामध्ये मध मिसळा आणि बोटाच्या मदतीने तुम्ही डोळ्यांच्या खालील भागात हलक्या हाताने मसाज करा. हा मसाज तुम्ही दोन मिनिटे करा. दहा ते पंधरा मिनिटे ते तसेच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. ही पद्धत आठवडातून तीन वेळा तुम्ही करू शकता.

दुसरी पद्धत

एक बटाटा तुम्ही मिक्सरच्या मदतीने बारीक करा. आणि त्या मिश्रणात कॉफी पावडर घाला. हा पॅक डोळ्याखाली लावा आणि दहा मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हे तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.

तिसरी पद्धत

तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील किंवा डाग असतील, यापासून जर सुटका मिळवायची असेल, तर तुम्ही सगळ्यात आधी एक बटाटा घ्या आणि एक टोमॅटो घ्या. ते दोन्ही बारीक करून तुमच्या चेहऱ्याला मसाज करा. पंधरा मिनिटे तुम्ही हा मसाज करा. त्यानंतर दहा मिनिटे ते तसेच ठेवा. त्यानंतर टिशू पेपरने घासून ते काढा. थंड पाण्याने तोंड धुवा तुम्ही दहा पॅक आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता. तुम्हाला महिन्याभरातच तुमच्या चेहऱ्यामध्ये चांगला फरक दिसू लागेल.