आता कोरोना नंतर ‘या’ रोगाचा आहे भारताला धोका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असून. त्यासाठी आरोग्य यंत्रणा जोमाने काम करताना दिसते. कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा एका महामारीचा धोका भारताला आहे असे काही तज्ञ् म्हणतात.

म्युकॉर मायकॉसिस (काळी बुरशी) हा आजार कोरोना होऊन गेलेल्या रुग्णाला होत असल्याच्या काही घटना देशभरात समोर आले आहेत. यावरच आम्ही औरंगाबाद येथील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या दंतरोग चिकित्सक आणि तज्ञ डॉक्टर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी माहिती ही दिली.

 

 

म्युकॉर मायकॉसिस हा रोग प्रथमतः जबड्या जवळील पोकळी आणि टाळू येथून सुरू होतो. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये आजकाल हा रोग आढळत आहे. याचे कारण असे की उपचारादरम्यान दिलेल्या औषधी मुळे मधुमेह असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. हा रोग कोरोना बाधित रुग्णांना होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या तोंडाची स्वच्छता अगदी काळजीपूर्वक केली पाहिजे. कोरोनातून बरे झाल्यास कान-नाक-घसा डोळे दात याबद्दल काहीही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

-डॉ स्वाती यादव, दंतरोगतज्ज्ञ 

 

 

म्युकोरचे (काळी बुरशी) निराकारण करण्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. त्यासाठी एम.आर.आय, इंडॉस्कॉपी या चाचण्यांची आवश्यकता असते. रुग्णाची परिस्थिती बघून त्यावर कुठले वैद्यकीय उपाय करता येईल ते ठरते. जर ही बुरशी नाकाद्वारे डोळ्यांपर्यंत गेले तर रुग्णाला आपला डोळा गमवावा लागेल. जर ही बुरशी मेंदूपर्यंत गेली तर रुग्णाला प्राणही गमवावे लागतील. त्यासाठी शस्त्रक्रिया आणि सुरुवातीच्या कळत केलेले उपचार महत्वाचे ठरतात.

-डॉ विजय पठाडे, तज्ज्ञ डॉक्टर 

Leave a Comment