Friday, January 27, 2023

पुण्यातील स्मशानभूमीत अघोरी कृत्य; 2 तृतीयपंथांना अटक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । अघोरी कृत्य आणि जादूटोणा करण्याचा खेळ सर्वत्र अजूनही सुरूच आहे. अशीच एक धक्कदायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी कृत्य करणाऱ्या २ तृतीयपंथांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या धक्कादायक घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री वैकुंठ स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही तासाने लक्ष्मी शिंदे आणि मनोज धुमाळ हे तृतीयपंथ त्या चितेजवळ आले. त्यानंतर दोघांनी त्यांच्यासोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सुया आणि हळदी कुंकू हे साहित्य घेऊन जादूटोण्याप्रमाणे कृत्य करण्यास सुरवात केली. त्याचवेळी हा प्रकार वैकुंठ स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्यांने बघितला. त्यानंतर त्याने विश्रामबाग पोलिसांना या प्रकारासंदर्भात माहिती असता पोलीस काही वेळातच वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचले. त्यांनी दोन्ही तृतीय पंथीयांना रंगेहात पकडलं आणि ताब्यात घेतलं.

- Advertisement -

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात नरबळी व इतर अमानुष अघोरी, दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे पुरोगामी पुण्यात अजूनही अंधश्रद्धेचे प्रकार सुरु असल्याचं दिसत आहेत.