माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची मोठे कारवाई!! 18 OTT प्लॅटफॉर्मस केले ब्लॉक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ऑनलाइन माध्यमांवर अश्लील आणि असभ्य मजकूर प्रसारित केल्यामुळे गुरुवारी माहिती आणि प्रसारण मंत्रायलयाने (Ministry of Information and Broadcasting) 18 OTT प्लॅटफॉर्मवर मोठी कारवाई केली आहे. मंत्रालयाने देशभरातील 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक करून टाकले आहेत. याबाबतचे वृत्त ANI कडून देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, OTT प्लॅटफॉर्म बरोबर मंत्रालयाने देशभरातील 19 वेबसाइट, 10 ॲप्स, 57 सोशल मीडिया हँडलही ब्लॉक केले आहेत. या सर्व प्लॅटफॉर्मवरून सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत होती. त्यामुळेच या विरोधात मंत्रालयाने कठोर पाऊल उचलले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने अनेक इशाऱ्यांनंतर अश्लील आणि असभ्य मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत. आज देशभरातील 19 वेबसाइट, 10 ॲप्स, OTT प्लॅटफॉर्मचे 57 सोशल मीडिया हँडल ब्लॉक करण्यात आल्याचे सरकारचे सांगितले आहे. हे प्लॅटफॉर्म्स भारतीय दंड संहिता आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व कायद्यासह इतर अनेक कायदेशीर नियमांचे उल्लंघन करत होते. या कारणांमुळेच ही कारवाई केल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

कोणते प्लॅटफॉर्म्स ब्लॉक केले?

दरम्यान, मंत्रालयाकडून ब्लॉक करण्यात आलेल्या ओटीटींमध्ये एक्स प्राईम, न्यूफ्लिक्स, प्राईम प्ले, चिकूफ्लिक्स, फुगी, एक्स्ट्रामूड, ड्रीम्स फिल्म्स, येस्मा रॅबिट, निऑन एक्स व्हीआयपी, हंटर्स, हॉट शॉट्स व्हीआयपी, मोजफ्लिक्स, मूडएक्स, बेशरम्स, अनकट अड्डा, ट्रिफ्लिक्स, या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.