मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; BMC ने घेतला पाणी कपातीचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई शहरवासीयांना आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. तसा निर्णयच बृहन्मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. मलबार हिल येथील जलाशयाच्या दुरुस्तीचे काम महाननगर पालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेले आहे. त्यासाठी जलाशयाची पाहणी करून त्यानुसार दुरुस्ती संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी IIT पवई येथील तज्ञ प्राध्यापक व महानगरपालिकेचे अधिकारी व अभियंते जलाशयाची पाहणी करणार आहेत.

मुंबईतील काही भागात 10 % पाणी कपात केली जाणार:

तज्ज्ञ समितीमार्फत गुरूवार, दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक 1 ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. या कारणाने जलाशयाचा कप्पा क्रमांक 1 रिक्त करणे आवश्यक आहे. सबब, त्यासाठी खालील भागांत पाणीपुरवठ्यामध्ये पाणीकपात करावी लागणार आहे. त्यामुळे मुंबई शहरातील अनेक विभागात पाणी कपात करावी लागणार आहे. तश्याप्रकारच्या पाणी कपाती संदर्भातील नियोजन बृहन्मुंबई महानगर पालिकेने केले आहे.

यानुसार मुंबईतील काही भागात 10 % पाणी कपात केली जाणार आहे.  ‘ए’ विभाग  मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्र –  सी विभाग- मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘सी’ विभागातील सर्व क्षेत्र –  डी विभाग –  मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘डी’ विभागातील सर्व क्षेत्र –  जी दक्षिण व जी उत्तर विभाग- जी दक्षिण व जी उत्तर विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग वरील सर्व विभागात महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या नियोजनानुसार 10 % पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे वरीलपैकी काही भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. पाणीकपाती दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात  येईल. सदर कालावधीत पाण्याळचा जपून वापर करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.