बेस्टला मिळाली महापालिकेची मदत; दिला 500 कोटींचा आधार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बेस्ट (BEST) ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. परंतु मागच्या काही वर्षांपासून बेस्टची स्थिती ही खालवली होती. यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांची देणी थांबली होती. ही एकूण सर्व स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने बेस्टला तब्बल 500 कोटींची मदत केली आहे. या मदतीचा फायदा बेस्टला होणार आहे.

बेस्टच्या प्रवाश्यांची घटली संख्या

बेस्टचे अचानक प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे बेस्टला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. जिथे बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही 42 ते 45 लाख एवढी होती. ती आता 30 ते 35 लाखांवर आली आहे. त्यामुळे बेस्टची स्थिती खालावली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची देणी देणे अवघड झाले आहे. तसेच बेस्ट खरेदी करण्यासाठीही पैसे कमी पडत आहेत. त्यामुळे बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी आर्थिक मदतीसाठी काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये बेस्ट उपक्रमाला निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे बेस्टकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे.

अर्थसंकल्पात केली होती मागणी

बेस्टची आर्थिक स्थित खालावल्यामुळे 2014 -15 पासून पालिका आर्थिक मदत देण्यात येते. त्यामुळे या मदतीचा आकडा आतापर्यंत तब्बल 8069.18 हजार कोटींपर्यंत जावून ठेपला आहे. तर या मदतीबाबत अर्थसंकल्पात पालिकेकडे तीन हजार कोटी देण्याची मागणी केली आहे. त्याच गोष्टीला समोर ठेवत बेस्टला 500 कोटींची मदत करण्यात आली आहे. 8069.18 या निधीमध्ये 2019 -20 ते 2023-24 मधील 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत या कालावधीत 3425.32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर याव्यतिरिक्त अनुदान रक्कम म्हणून 4643.86 कोटी रुपये असे एकूण 8069.18 कोटी एवढय़ा रकमेचे अधिदान महापालिकेने ‘बेस्ट’ला केले आहे.