Bmc Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक पदासाठीची ‘ती’ अट रद्द; भरली जाणार तब्बल 1846 पदे

Bmc Recruitment 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bmc Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. नुकतेच काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिका (Bmc Recruitment 2024) अंतर्गत एक भरती निघाली होती. ही भरती कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदासाठी निघालेली होती. या पदाच्या एकूण 1846 रिक्त जागा आहेत.आणि यासाठी राज्यातून अनेक तरुणांनी अर्ज देखील केलेले आहे. परंतु बीएमसीने दहावी उत्तीर्ण प्रथम प्रयत्नात पास असणे ही अट घातली होती. त्यामुळे अनेक लोकांना अर्ज देखील करता आला नाही. या अटीविरुद्ध राज्यभरात संताप व्यक्त केला जात होता. असेच आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील याबाबत रद्द करण्याची मागणी केलेली आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट करून ही मागणी केलेली आहे. यानंतर आता बीएमसी प्रशासनाला एक परिपत्रक जारी केलेले आहे. आणि अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे. ती म्हणजे आता या भरतीसाठी दहावी तसेच पदवी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्यात आलेली आहे. आता या भरतीसाठी राज्यातील लाखो उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

15 दिवसात नवीन जाहिरात |Bmc Recruitment 2024

बृण्मुंबई महानगरपालिके अंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदाच्या जागा भरण्यासाठी 20 ऑगस्ट 2024 पासून सुरुवात झालेली होती. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आलेले आहेत. परंतु अर्ज करताना पदवी परीक्षेत आणि दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे. ही शिक्षणाची अट लागू करण्यात होती. परंतु आता ही प्रथम प्रयत्नात रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ही मागणी देखील रद्द करण्यात आलेली आहे. आता येत्या 15 दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

सध्या बीएमसी कडून शैक्षणिक पात्रतेमध्ये सुधारणा करण्याची प्रयत्न देखील चालू झालेले आहेत. आता या सुधारित शिक्षण अहर्तेनुसार कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जाहिरात नव्याने प्रसिद्ध केली जाणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ 15 दिवसाच्या आतच ही भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार आहे. अशी माहिती महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आलेली आहेत. महानगरपालिकेने घेतलेले या निर्णयामुळे आता राज्यभर ते लाखो उमेदवारांना दिलासा मिळालेला आहे. आता अनेक लोकांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत. परंतु ज्या लोकांनी आधी अर्ज केलेली आहेत. त्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. त्यांचे हेच अर्ज पुढील भरती प्रक्रियेत देखील ग्राह्य धरले जाणार आहेत. असे महानगरपालिका प्रशासनाने सांगितलेले आहे.