पुणे | शैक्षणिक , साहित्यिक, कला, अशा विविध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी केलेल्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी रौप्य मुद्रा अनावरण तसेच डॉ सायरस पूनावाला यांना डॉक्टर ऑफ़ ह्यूमन लेटर्स हा सन्मान मिळाल्याबद्दल गौरवण्यात येणार असल्याची माहिती बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष अरूण निम्हण, कार्यक्रम प्रमुख सचिन नाईक यांनी दिली. यावेळी बाळासाहेब गांजवे,सुरेश केकाणे, राजेंद्र मराठे, किशोर लोहकरे हे देखील उपस्थित होते.
मंगळवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
यप्रसंगी प्रसिद्द अभिनेते मोहन जोशी गाढवाचं लग्न हे वगनाट्य सादर करणार आहेत.
मोहन जोशी म्हणाले ” तब्बल २० वर्षानंतर गाढ़वाच लग्न हे नाटक माजी विद्यार्थी संघटनेच्या आग्रहाखातर करणार आहे. या वगनाट्यात नंदेश उमप यांचा विशेष सहभाग असणार आहे.”
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिति पालकमंत्री गिरीश बापट, के.पी.आय.टी. चे चेअरमन रवि पंडित यांची असणार आहे व अमृतमहोत्सवी गीत राहुल देशपांडे, सावनी शेंडे, बेला शेंडे, भुषण मराठे, गंधार संगोराम गाणार आहेत.