BMW Colour Changing Car : सरड्याप्रमाणे रंग बदलणारी कार पाहिली आहे का? 32 रंग बदलणाऱ्या या कारची ‘इतकी’ आहे किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांनी आपले कारचे मॉडेल तयार केले आहेत. मात्र, ऑटोमोबाईल क्षेत्रात BMW कंपनीने आपली अनोखी अशी एक कार बाजारात आणली आहे. (BMW Colour Changing Car) च्या माध्यमातून कंपनीने काहीही अशक्य नाही हे दाखवून दिले आहे. कारमधील एक बटण दाबल्यावर तिचा एक नाही दोन नाही तर तब्बल 32 रंगात बदल होतोय. पाहूया या अनोख्या कारची काय आहेत वैशिष्ट्ये…

BMW Color Changing Car

जगातील पहिली रंग बदलणारी कार (BMW Color Changing Car)

BMW कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर जगातील पहिली रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार i-Vision DE सादर केली आहे. या कारचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे हि तब्बल 32 रंग बदलून वापरता येते. BMW ने लॉस वेगास येथे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2023 मध्ये हि कार सादर केली आहे. गेल्या वर्षीही BMW ने ही कार प्रदर्शनासाठी ठेवली होती.

BMW Color Changing Car

BMW i-Vision DI चे अनोखे ‘हे’ आहेत फिचर्स

BMW च्या या अनोख्या रंग बदलणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये फुल टच स्क्रीन डॅशबोर्ड, हाय-टेक फिचर्ससह प्रशस्त लक्झरी केबिन आहे. याशिवाय मोठ्या आकाराचे हेड अप डिस्प्ले, 16 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एआय, व्हॉईस कमांड्स यांसारखे फिचर्स या कारमध्ये देण्यात आलेले आहेत.

BMW Color Changing Car

कारचा रंग कसा बदलतो? (BMW Color Changing Car)

BMW कंपनीने आय-व्हिजन डी ही तयार केलेली हि कार अनेक कलर बदलणारी कार आहे. कंपनीने Less is More या टॅगलाइनसह ही कार सादर केली आहे. या कारमध्ये प्रामुख्याने रंग बदलण्यासाठी खास पध्दीच्या पॅनल्सचा वापर करण्यात आलेला आहे. ते म्हणजे 240 ई-इंक पॅनल्स होय. या पॅनल्समुळे या कारला 32 रंग बदलता येतात. या कारची रंग बदलण्याची प्रक्रिया इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे नियंत्रित करण्यात आली आहे.

‘इतकी’ आहे कारची किंमत

या कारमध्ये असलेल्या अनोख्या फिचर्समुळे याची किंमतही तशी खूप असणार यात शंका नाही. वास्तविक या कारची किंमत आणि लॉन्चिंगबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच BMW आपली टेक्नॉलॉजी कार 2025 पर्यंत बाजारात आणू शकते. (BMW Color Changing Car)

BMW Color Changing Car

500 ते 700 किमी पर्यंत ड्रायव्हिंग पॉवर रेंज

BMW i-Vision DEE ही कार पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल 500 ते 700 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो. ही कार चार्ज करण्यासाठी फास्ट चार्जरचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे कार कमी वेळेत जास्त चार्ज होऊ शकते.

BMW Color Changing Car

कारचा रंग बदलण्याचे ‘हे’ आहेत फायदे

BMW i-Vision DEE या कारमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 32 रंगाचा वापर हा कारसाठी खूप फायद्याचा ठरेल. कारण उन्हाळ्यात तुम्ही सफेद रंग आणि थंडीत काळा रंग वापरू शकता. सफेद रंग सूर्यकिरणे शोषूण घेत नाही. ज्यामुळे कार गरम होत नाही. तर काळा रंग सूर्यकिरणं शोषूण घेतो, ज्यामुळे थंडीतही ही कार गरम राहते. (BMW Color Changing Car)