हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच बघायला मिळत आहे. दिसायला अतिशय आकर्षक आणि महत्वाचे म्हणजे पेट्रोल टाकायची झंझट नसल्याने अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. वाढत्या पसंतीमुळे इलेक्ट्रिक गाड्यांची मागणीही वाढली आहे . त्यामुळे देशात नवनवीन गाड्या लाँच होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी BMW आपली नवी इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. BMW CE 02 असं या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव असून ती ऑक्टोबर मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर 90 किलोमीटर अंतर पार करेल असं बोललं जातंय. आज आपण BMW च्या या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.
BMW ने आपली इलेक्ट्रिक स्कूटर, BMW CE 02 येत्या १ ऑक्टोबर 2024 रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे. या स्कूटरमध्ये आधुनिक डिझाइन, उच्च कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. खासकरून शहरातील प्रवासासाठी ही इलेक्ट्रिक स्कुटर डिझाइन केली गेली आहे. BMW ने TVS मोटर्स बरोबर पार्टनरशिप करून हि इलेक्ट्रिक स्कूटर CE 02 तयार करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फ्लॅट सीट देण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की स्कूटरच्या पुढील भागात प्रीमियम घटक म्हणून USD वापरण्यात आले आहेत. मागे एक मोनोशार्क स्थापित आहे. या स्कूटरमध्ये 14 इंची चाके लावण्यात आली आहेत.
रेंज किती?
BMW CE 02 इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 2 kWh लिथियम-आयन असून, त्याचसोबत 15 BHP इलेक्ट्रिक मोटर आहे. कंपनीचा दावा आहे कि एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर 90 किमी एवढे अंतर आरामात कापू शकते. यावेळी गाडीचे टॉप स्पीड 95 किमी प्रतितास इतकं राहील. ही स्कूटर बेल्ट ड्राईव्ह तंत्रज्ञानावर चालणार आहे.
अन्य फीचर्सबाबत सांगायच झाल्यास यामध्ये यात फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक्स, ABS, USD फॉर्क आणि मोनोशॉक , राइडिंगसाठी मल्टिपल मोड, एलईडी हेडलाइट, रिव्हर्स गियर, की-लेस राइड, तसेच कनेक्टिव्हिटीसाठी 3.5 इंचचा TFT डिस्प्ले आणि USB-C पोर्टद्वारे स्कूटरवर स्मार्टफोन चार्ज करण्याची सुविधा आहे. तसेच ब्लूटूथ इंटरफेसही उपलब्ध आहे, ज्यामुळे राइडरला स्मार्टफोनचा वापर करून नेव्हिगेशन साठी उपयोग करता येईल.
किंमत किती?
BMW ने अजून तरी CE 02 च्या किमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. पण या EV ची किंमत CE 04 पेक्षा खूपच कमी असू शकते. BMW CE 04 ची किंमत 14.90 लाख रुपये होती मात्र BMW CE 02 ची किंमत अंदाजे 4 लाख ते 5 लाख या दरम्यान असण्याची शक्यता आहे