व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

लोकांनी भरगच्च भरलेली बोट नदीत उलटली, दुर्घटनेचा लाईव्ह Video आला समोर

गाझिपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील गाझिपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना (boat accident) घडली आहे. यामध्ये मुलं आणि बायकांनी खचून भरलेली बोट अचानक नदीमध्ये उलटली(boat accident). या दुर्घटनेमुळे (boat accident) परिसरात मोठी खळबळ उडाली. आपल्या जनावरांना चारा घेऊन जात असताना हि भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या बोटीत जवळपास 25 लोक होते. गंगा नदीत ही बोट उलटली आहे.

या भीषण अपघातात (boat accident) बोटीतील 7 जण वाहून गेले. रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही दुर्घटना घडली आहे.गंगा नदीच्या पुरात बुडालेल्या 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर पाण्यात बुडालेल्या 5 मुलांचा अद्याप शोध सुरू आहे. बोटीतील लोक जनावरांसाठी चारा घेऊन जात होते, त्याच दरम्यान बॅलन्स बिघडल्याने बोट बुडाल्याचे प्राथमिकदृष्या समोर आले आहे.

या दुर्घटनेत (boat accident) ग्रामस्थांनी बुडणाऱ्या 12 लोकांना वाचवलं आहे. तर बाकी बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमुळे (boat accident) परिसरात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी यमुना नदीमध्ये बोट बुडून अशीच दुर्घटना घडली होती.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर