Wednesday, February 1, 2023

पुणे शहरात वाहतुकीसाठी होड्या घेण्यात याव्या; NCP ची आयुक्तांकडे मागणी

- Advertisement -

पुणे प्रतिनिधी | अमित येवले
गेले काही दिवस पुण्यातील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी साठत आहे, शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावर यावेळी पहिल्यांदा पाणी साचले. या साचलेल्या पाण्यामुळे काही ठिकाणी दुचाकी व चारचाकी गाड्या वाहून गेल्या. या सर्व परिस्थीतीमुळे सर्वसामान्य पुणेकर अडकून पडला, पुणेकरांवर अशी वेळ येऊ नये याकरिता आपण यापुढील काळात शहरात वाहतुकीसाठी होड्या घ्याव्यात, अशी उपरोधिक मागणी पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष मनोज पाचपुते यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली.

निधीचा दुरुपयोग करुन जास्त कमिशन मिळणारे दिखाऊ काम करायचे आणि पावसाळी लाईन साफसफाई व ड्रेनेज लाईन दुरुस्ती यासारख्या महत्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करणे हेच काम गेले पाच वर्षे पुणे महापालिकेत सत्तेत असणाऱ्या कारभारी लोकांनी केले, त्यामुळे पुणेकरांवर ही वेळ आली. गेल्या पाच वर्षात स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुण्याचा विकासाचे कसे वाटोळे झाले हे संपूर्ण जगाने गेल्या दोन चार दिवसांत पाहिले. स्वच्छता क्रमवारीत घसरण झाल्याने स्वच्छ पुणे सुंदर पुणे या बोर्डांचा तर पुण्यात काही उपयोग नाही हे सिध्द झाले आहे पण यापुढे पुण्यात I Love PUNE असे बोर्ड लावण्यापेक्षा SAFE PUNE असे बोर्ड लावण्याची वेळ महापलिकेवर येउ नये अशी खबरदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

पावसामुळे शहरात तसेच उपनगरातील अनेक रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकी, चारचाकी व बस याचा वाहतूकीसाठी काहीच उपयोग झाला नाही, या साचलेल्या पाण्यामुळे काही ठिकाणी दुचाकी व चारचाकी गाड्या वाहून गेल्या. या सर्व परिस्थीतीमुळे सर्वसामान्य पुणेकर अडकून पडला, पुणेकरांवर अशी वेळ येऊ नये याकरिता आपण यापुढील काळात वाहतुकीसाठी होड्या घ्याव्यात, जेणेकरुन पावसाळ्यात नागरीकांचे हाल होणार नाहीत, व नागरीकांसाठी पुणे महानगरपालिका काहीतरी उपाययोजना करते असे त्यांना दाखविण्यास आपणांस उपयुक्त ठरेल. तरी कृपया आपण पुढील अंदाजपत्रकात शहरात वाहतूकीसाठी होड्या घेण्याची तरतूद करावी अशी विनंती युवक राष्ट्रवादीने पत्राद्वारे केली गेली