हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BOB Home Loan Rates । तुम्हीही नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल आणि कर्जाच्या चिंतेत असाल तर आता हि चिंता सापडून द्या….. देशातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आपल्या गृहकर्जांवरील व्याजदरात कपात केली आहे. यापूर्वी बँक ऑफ बडोदाचे गृहकर्जावरील व्याजदर ७.५० टक्के होते, ते आता ७.४५ टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच यामध्ये ०.०५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. यामुळे कर्जदारांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. तसेच पैशाचीही मोठी बचत होणार आहे.
तस बघितलं तर बँक ऑफ बडोदाने (BOB Home Loan Rates) जून महिन्यात सुद्धा गृहकर्जावरील व्याजदर कमी केले होते. त्यावेळी गृहकर्ज ८.०० टक्क्यांवरून ७.५० टक्के केले होते. आता ७.४५ टक्के वार्षिक नवीन दर लागू करण्यात आला आहे, जो मागील दरापेक्षा ०.०५ टक्के कमी आहे. व्याजदरात कपात करण्यासोबतच, बँकेने नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. यामुळे फक्त कर्जच स्वस्त होणार नाही तर गृहकर्ज प्रक्रियाही पूर्णपणे फ्री मध्ये होईल. सीएनबीसीच्या अहवालानुसार, बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय मुदलियार म्हणाले, “गृहकर्ज दरातील या नवीन कपातीचे उद्दिष्ट घर खरेदी करण्याच्या लोकांच्या इच्छेला पाठिंबा देणे आणि क्रेडिट ग्रोथ वाढवणे आहे.” तुम्ही गृहकर्जासाठी डिजिटल किंवा शाखेत अर्ज करू शकता.
बँक ऑफ बडोदा व्यतिरिक्त, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडिया (बीओआय) यांनीही त्यांच्या गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहे. या सर्व बँकांनी जुलैमध्ये त्यांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट म्हणजेच एमसीएलआरमध्ये 5 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे.
EMI किती राहील? BOB Home Loan Rates
जर तुम्ही बँक ऑफ बडोदा मधून २० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, आणि त्याचा कालावधी २० वर्षांसाठी असेल तर तुम्हाला ७.४५ टक्के वार्षिक व्याजदराने दर महिन्याला १६,०५१ रुपयांचा EMI भरावा लागेल.




