हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (BOB Lite Savings Account) देशातील आर्थिक क्षेत्रात बँक ऑफ बडोदा (BOB) ही बँक चांगल्या स्तरावर कार्यरत आहे. बँक ऑफ बडोदा कायम आपल्या ग्राहकांना विविध सुविधा प्रदान करते. विशेष म्हणजे, ही बँक आपल्या ग्राहकांना आर्थिक सुरक्षेसह इतरही महत्वाचे फायदे देते. बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष बचत खाते योजना देखील सुरु केली आहे. ज्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची चिंता सतावत नाही. अर्थात या खात्याअंतर्गत तुम्हाला आजीवन झिरो बॅलन्सची सेवा प्रदान केली जाते. चला तर जाणून घेऊया बँक ऑफ बडोदाच्या या खास खात्याविषयी अधिक माहिती.
बँक ऑफ बडोदा लाईट सेव्हिंग अकाउंट (BOB Lite Savings Account)
बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी एक खास बचत खाते योजना सादर केली आहे. या बचत खात्याचे नाव ‘बँक ऑफ बडोदा लाईट सेव्हिंग अकाउंट’ असे आहे. या खात्याद्वारे ही बँक आपल्या ग्राहकांना अत्यंत महत्वपूर्ण सुविधा प्रदान करते आहे. बँकेने हे बचत खाते सणासुदीच्या काळात सुरू केले होते. मात्र ग्राहक हे खाते कधीही उघडू शकतात. या खात्याची खासियत अशी की, हे खाते शून्य शिल्लक असताना उघडता येते. शिवाय हे आजीवन शून्य शिल्लक बचत खाते आहे. त्यामुळे किमान शिल्लकची चिंता मिटली.
बँक ऑफ बडोदा लाईट सेव्हिंग अकाउंटचे फायदे
जर तुम्ही बँक ऑफ बडोदा लाईट सेव्हिंग अकाउंट सुरु केलात तर सगळ्यात महत्वाचा फायदा असा होईल की, तुम्हाला या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज पडणार नाही. (BOB Lite Savings Account) तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार या खात्यात आणखी काही वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. ज्यामध्ये रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड हे त्रैमासिक आधारावर नाममात्र शिल्लक ठेवून लाइफटाईम मोफत दिले जाते. इतकेच नव्हे तर, काही खातेदारांना या खात्याअंतर्गत आजीवन मोफत क्रेडिट कार्डदेखील दिले जाते.
खातेधारक कोण असू शकतो?
बँक ऑफ बडोदाचे हे शून्य शिल्लक खाते १० वर्षांपेक्षा जास्त वय असेल अशी कोणतीही व्यक्ती उघडू शकते. महत्वाचे म्हणजे, १० ते १४ वयवर्षे असलेल्या खाते धारकांचे एकल खाते असेल तर कोणत्याही दिवशी खात्यातील कमाल शिल्लक १० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी. या खात्याबद्दल बोलताना मोफत रूपे प्लॅटिनम डेबिट कार्डबद्दल सांगायचे झाले तर, तुम्हाला मेट्रो शहरांत ३ हजार रुपये तर निमशहरी भागात २ हजार रुपये आणि ग्रामीण भागात १ हजार रुपये त्रैमासिक ताळेबंद ठेवणे बंधनकारक असेल. लक्षात घ्या, ही शिल्लक न ठेवल्यास वार्षिक दंड भरावा लागेल. (BOB Lite Savings Account)