Bobby Darling : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ!! विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूसोबत बॉबी डार्लिंगचा ‘वन नाईट स्टँड’

Bobby Darling Munaf Patel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bobby Darling। चित्रपट आणि टीव्ही जगतात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ट्रान्स अभिनेत्री असलेल्या बॉबी डार्लिंगनं एका भारतीय क्रिकेटपटू बद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. भारताचा माजी जलदगती गोलंदाज आणि २०११ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेतील खेळाडू मुनाफ पटेल सोबत आपण ‘वन नाईट स्टँड केला असल्याचा धक्कादायक खुलासा बॉबी डार्लिंगनं केला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. बॉबी डार्लिंगच्या या खुलाश्यावर मुनाफ पटेलने मात्र अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आधी ओढ मग प्रेम- Bobby Darling

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना बॉबी डार्लिंगनं म्हंटल कि, तिचा एका माजी क्रिकेटपटूसोबत वन नाईट स्टँड होता. हे सांगताना तिने माजी भारतीय क्रिकेटपटू मुनाफ पटेलचे नाव घेतले. बॉबी म्हणाली, त्या वेळी आम्ही मित्र होतो आणि आम्ही एका क्लबमध्ये भेटलो. आम्ही एकत्र क्लबिंग आणि पार्टी करत होतो आणि त्या काळात लोकांनी आम्हाला एकत्र पाहिले आणि कोणीतरी मला सांगितले की मी मुनाफसोबत पार्टी केली आहे आणि मी त्याला भेटलो आहे. मी कधीच असे म्हणणार नाही की नाते होते, पण माझ्याकडून थोडीशी ओढ होती. जेव्हा लोक एकमेकांना भेटतात तेव्हा आधी ओढ असते आणि नंतर प्रेम होते. प्रेम होते पण मी त्याला काय म्हणू शकतो, कदाचित ‘वन नाईट स्टँड’ असं म्हणत बॉबी डार्लिंगनं (Bobby Darling) खळबळ उडवून दिली.

बॉबीने पुढे म्हंटल, मी याबाबत मीडियामध्ये सांगितलं होतं. म्हणूनच आमचं नातं संपलं… जेव्हा मी हे प्रकरण सार्वजनिक केले तेव्हा मुनाफने मला सांगितले की यामुळे त्याची बदनामी होईल. इतर क्रिकेटपटू काय विचार करतील, ते काय म्हणतील अशी भीती मुनाफला वाटतं होती असं बॉबी डार्लिंगने म्हंटले.

कोण आहे मुनाफ पटेल?

मुनाफ पटेल हा भारताचा माजी जलदगती गोलंदाज आहे. मूळचा गुजरातचा असलेल्या मुनाफने कसोटी, वनडे आणि टी २० अशा तिन्ही प्रकारात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. मुनाफ पटेलने २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले . त्याने बी भारतासाठी १३ कसोटी, ७० एकदिवसीय सामने आणि ३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. दुखापतींमुळे तो नेहमी संघाच्या आत बाहेर राहिला. त्यामुळेच त्याला निवृत्तीही लवकर घ्यावी लागली. २०११ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघात मुनाफ पटेलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने ८ सामन्यांत ११ बळी घेतले होते. विशेषतः पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्यांची गोलंदाजी उल्लेखनीय होती.