Boji Isambul : स्मार्ट डॉग…! रोज Metro मधून प्रवास करतो हा कुत्रा; प्रवाशांच्या नियमांचेही करतो पालन

xr:d:DAGA-aQBh7M:133,j:2523565890367049146,t:24040806
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Boji Isambul : इस्तंबूल हे शहर एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. मात्र इस्तम्बूल आता एका वेगळ्या आणि अनोख्या गोष्टीसाठी सुद्धा ओळखले जाऊ लागले आहे. इस्तम्बूलचं नाव आता एका कुत्र्यामुळे चर्चेत आले आहे. होय आम्ही ज्या कुत्र्याबाबत सांगत आहोत हा एक भटका रस्त्यावरचा कुत्रा आहे. ज्याचं नाव बोजी असं ठेवलं आहे. हा बोजी सध्या दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. बोजी दररोज इस्तम्बूल मधल्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करतो. तोही काही साधासुधा प्रवास नाही तर तब्बल ३० किलोमीटरचा प्रवास हा बोजी (Boji Isambul) दररोज करतो. त्यामुळे हा प्रवासप्रेमी बोजी सध्या सोशल मीडिया सेन्सेशन झाला आहे.

बोजी तुर्कस्तानमधील प्रसिद्ध शहर इस्तंबूलच्या बस, ट्रेन आणि फेरीमध्ये प्रवास करतानाही दिसतो. सामान्य लोकांप्रमाणे, तो दररोज प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करतो. एखाद्या प्राण्याबद्दल तुम्ही एखाद्या ठराविक मार्गावरून प्रवास करत असल्याबद्दल किंवा सार्वजनिक वाहन वापरण्याबद्दल ऐकले असेल परंतु बोजी (Boji Isambul) नावाचा हा कुत्रा इतका हुशार आहे की तो प्रत्येक वाहतुकीचा मार्ग वापरतो. रोज भेट देणारे लोक या कुत्र्याशी चांगलेच परिचित झाले आहेत. बोजीला जुन्या तुर्की शहरात प्रवास करताना पाहणे हे नवीन गोष्ट नाही, मात्र जगासाठी नक्कीच ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे.

बोजीवर लोकांचा जीव (Boji Isambul)

बोजी नावाच्या या कुत्र्याने सार्वजनिक वाहनांतून असा प्रवास केव्हा सुरू केला हे कोणालाच माहीत नाही, पण आता रोजचे प्रवासी बोजीला चांगलेच ओळखतात. सिवास कैंगल आणि शेफर्ड डॉग चे क्रॉस ब्रीड असलेल्या बोजीला चालत जाण्यापेक्षा वेगवेगळ्या सार्वजनिक वाहनांतून प्रवास करायला चांगलेच आवडते. जेव्हा लोकांच्या लक्षात येऊ लागले तेव्हा त्यांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. कधी बोजी (Boji Isambul) बसमध्ये, कधी मेट्रोत, कधी ट्रेन किंवा फेरीतही दिसतो आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर झटपट व्हायरल होतात. बोजीने सध्या तुर्कीमध्ये सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवली आहे.

ऐतिहासिक स्थळांवर जाणाऱ्या रेल्वे आणि मेट्रो मार्गांसह, बोजी (Boji Isambul) काही ठराविक मार्ग सर्वाअधिक वापरतो.विशेष म्हणजे बोजीला वाहतुकीचे सर्व नियम माहीत आहेत. एस्केलेटरवर कसे जायचे आणि मेट्रोमध्ये चेक इन केल्यानंतर थांबायचे हे देखील त्याला माहित आहे. त्यामुळे या नियम पाळणाऱ्या बाजींचे सर्वत्र कौतुक होते आहे.