केएल राहुल-अथिया शेट्टीचं ‘शुभमंगल सावधान’; खंडाळ्यात झाला विवाह सोहळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल अखेर आज लग्नबंधनात अडकले. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने त्यांनी लग्नगाठ बांधली. या सोहळ्याला बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील 100 पाहुणे आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

https://www.instagram.com/p/B4h0r7PBOE2/?utm_source=ig_embed&ig_rid=c6bd6302-2af1-4c26-9fd9-6a0be47e7004

अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाच्या निमित्ताने अथिया शेट्टीचे वडील आणि बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी यांच्या पोषाखाची चांगली चर्चा होत आहे. त्यांनी पेस्टल गुलाबी रंगाचे धोतर आणि कुर्ता घातला असून त्यांच्यासोबत मुलगा अहान शेट्टी आहे. दोघांनी पापाराझींना मिठाई देखील दिली आहे.

Athiya Shetty K L Rahul

सध्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या कपलच्या लग्नानंतर मुंबईत भव्य रिसेप्शन देण्यात येणार आहे, ज्यामध्ये मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. या पार्टीला तीन हजार पाहुण्यांची उपस्थिती असेल.

Sunil Shetty

या लग्नाला बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेरही पोहोचले आहेत. याशिवाय अथियाची फ्रेंड आणि स्टार किड्स कृष्णा श्रॉफ आणि अंशुला कपूरही लग्नात सहभागी झाली असून अर्जुन कपूर देखील बहीण अंशुला कपूरसोबत या जोडप्याच्या लग्नात सहभागी झाला आहे. कृष्णा ही जॅकी श्रॉफची मुलगी आहे. सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती खंडाळ्यात अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाला उपस्थित राहिले आहेत.

https://www.instagram.com/reel/CnwgcApDUqh/?utm_source=ig_web_copy_link

अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अखेर आज ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत.