अभिनेत्री अमीषा पटेल विरुद्ध कोर्टाचे अटक वॉरंट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी ।  बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध रांची कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. अमीषा पटेलवर चित्रपट निर्माते अजय कुमार यांचा अडीच कोटींचा चेक बाउंस केल्याचा आरोप आहे. २०१८ साली ‘देसी मॅजिक’ हा चित्रपट बनवण्यासाठी अजय कुमार यांनी अमीषाला तीन कोटी रुपये उसणे म्हणून दिले होते. त्यानंतर अमीषाकडे ज्या-ज्या वेळी या पैशांची मागणी केली त्या-त्या वेळी तिनं पैसे देण्याऐवजी काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली, असा आरोप अजय कुमार यांनी केला आहे. अमीषा पटेल पैसे परत देत नसल्याने अजय कुमार यांनी कोर्टात धाव घेतली होती.

‘देसी मॅजिक’ हा चित्रपट पूर्ण होऊ न शकल्याने निर्मात्याने अमीषाकडे पैशांची मागणी केली होती. मात्र अमीषाने मोठ्या मुश्किलीने अडीच कोटींचा चेक दिला. परंतु, ज्यावेळी हा चेक बँकेत जमा केला त्यावेळी तो बाउंस झाला. या चेक बाउंस प्रकरणी अमीषा विरुद्ध रांची कोर्टात पैशांची फसवणूक केल्याचा खटला सुरू आहे.

दरम्यान ‘फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत अमीषा हिला अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिनं एकदाही याला उत्तर दिले नाही. त्यानंतर कोर्टाने तिला अनेक वेळा समन्स पाठवले. पैशांवरून कोर्टात अनेकदा कारवाई करण्यात आली.’ अशी माहिती कुमार यांनी दिली. ३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेली अमीषा पटेल हिने प्रसिद्ध लोकांचे फोटो दाखवून धमकी दिल्याचा आरोपही अजय कुमार यांनी केला आहे. अमीषा पटेल विरोधात या आधीही फसवणूक केल्याचे आरोप झाले आहेत.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment