तान्हाजीनंतर आता बाजीप्रभूंचा पराक्रम पडद्यावर दिसणार; संजय दत्त साकारणार बाजीप्रभूंची भूमिका?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अलीकडच्या काही वर्षात बॉलीवूडमध्ये मराठा योध्यांच्या शौर्यांवर आधारित सिनेमांना बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बाजीराव मस्तानी पासून सुरु झालेला हा सिलसिला पानिपत, तान्हाजी पर्यंत येऊन ठेपला. मराठा योध्यांच्या जीवनावर आधारित या तिन्ही सिनेमांना देशभरात चांगली पसंती मिळाली ती त्यांच्या उत्कृष्ट कथानक आणि निर्मितीमुळं. दरम्यान, मराठा योध्यांच्या या भाऊगर्दीत आता आणखी एक सिनेमा येऊ घातला आहे तो म्हणजे ‘पावन खिंड’.

बाजीप्रभू देशपांडे यांनी पावन खिंडीत गाजवलेल्या अभूतपूर्व अशा पराक्रमावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. डॉ. काशीनाथ घाणेकर’ हा सिनेमा दिग्दर्शित केलेल्या अभिजीत देशपांडे याने याबाबत ट्विट करुन या आगामी चित्रपटाची माहिती दिली. या आगामी चित्रपटाचे नाव ‘पावन खिंड’ असे आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त बाजीप्रभू यांच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. अद्यापतरी या चित्रपटाविषयी फारशी माहिती समोर आली नसून यात कोणकोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हेदेखील स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, नुकतेच एका नेटकऱ्याने ट्विटच्या माध्यमातून या चित्रपटात संजय दत्तला बाजीप्रभू यांच्या भूमिकेसाठी कास्ट करण्याची विनंती केली होती. त्याच्या विनंतीवर अभिजीतने ओके अशी प्रतिक्रिया दिली. यावरुन पावनखिंडमध्ये संजय दत्त मुख्य भूमिकेत झळकणार अशी चर्चा आहे.

 

 

Leave a Comment