‘या’ बॉलिवूड स्टार्सच्या गिफ्टच्या किंमती ऐकून थक्क व्हाल !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । बॉलिवूडमधील सुपरस्टार्सच नाही तर अनेक सेलिब्रिटी त्यांनी दिलेल्या गिफ्टमुळे पुन्हा एकदा ख्रिसमसनिमित्तानं चर्चेत आले आहेत. भेटवस्तुमध्ये दिलेल्या महागड्या गिफ्टमुळे काही सेलिब्रिटींची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ड्रीम गर्ल सिनेमाची निर्माता एकता कपूर यांनी दिग्दर्शक राज शांडिल्य यांना 90 लाख रुपयांची गाडी भेट म्हणून दिली आहे. या 90 लाख रुपयांच्या जॅग्वार गाडीची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. हे गिफ्ट पाहून फॅन्स तर थक्क झाले आहेत. असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी खूप महागडे आणि भारी गिफ्ट दिले आहेत. पाहा कोण आहेत हे सिलेब्रिटी आणि काय दिली आहेत गिफ्ट्स.

सलमान खान आपल्या अभिनयासोबतच एक उत्तम चित्रकारही आहे. किक चित्रपटात सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडीस या दोघांनीही एकत्र काम केलं होतं. जॅकलिन सलमानची खास मैत्रीण असल्यानं तिला स्वत:च्या हातांनी रेखाटलेलं सुंदर चित्र सलमाननं गिफ्ट म्हणून दिलं आहे. या पेंटिंगची किंमत बाजारात जवळपास 2.5 कोटी रुपये आहे. जॅकलिनच्या अभिनयाने प्रभावित झाल्यानं हे खास गिफ्ट तिला देत आहे.

2012 रोजी प्रदर्शित झालेल्या अग्निपथ चित्रपटातील चिकनी चमेली गाण खूप प्रसिद्ध झालं होतं. या गाण्यावर कतरिना कैफने डान्स केला होता. कतरिनाच्या या चित्रपटातील कामावर करण जोहर खूश झाले होते. त्यांनी कतरिनाला फरारी भेट दिली. या चित्रपटानंतर करण आणि कतरिनामधील मैत्रीचं नात अधिक घट्ट झाल्याचं पाहायला मिळालं.

बॉलिवूडचा सुपरस्टार दबंग सलमान खानने शाहरुख खानच्या मुलाला ई-सायकल भेट म्हणून दिली आहे. सलमान खानने एनजीओ ब्रॅण्ड बिइंग ह्युमनची ई-सायकल शाहरुखचा लहान मुलगा अबराम खानला भेट दिली आहे.

Leave a Comment