अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी फिल्म क्रिटिक्स राजीव मसंदचा पोलिसांनी नोंदवला जबाब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आज चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांचा जबाब नोंदवण्यात आला. चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना कालच याप्रकरणी समन्स पाठवण्यात आले होते. त्यानंतर राजीव मसंद यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात हजेरी लावत आपला जबाब नोंदवला. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त काळात बॉलिवूडमधील अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

१४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेने सगळं बॉलिवूड विश्व हादरलं. मात्र काही दिवसातच सुशांत सिंह राजपूतचा बळी घराणेशाहीमुळे आणि गटबाजीमुळे गेला असेही आरोप सिनेसृष्टीतूनच झाले. यांनतर सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपस करायला सुरुवात केली. यांनतरसुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमागचे कारण समजून घेण्यासाठी बॉलीवूडमधील अनेकांना पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment