….म्हणून सुरेश वाडकरांनी नाकारले होते चक्क माधुरी दीक्षितचे स्थळ, कारण ऐकून व्हाल चकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या स्वरांनी मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा आज वाढदिवस.   7 ऑगस्ट 1955 साली कोल्हापुरात त्यांचा जन्म झाला.  हिंदी, मराठीसोबतच भोजपुरी, कोकणी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांत आणि उर्दू भाषेतूनही  त्यांनी गाणी गायली आहेत.  याच सुधीर वाडकरांनी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरीचे स्थळ नाकारले होते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? आज आम्ही याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

खरं तर सिनेमांत काम करण्यापेक्षा माधुरीने लग्न करून संसार करावा अशी तिच्या आई-वडिलाची इच्छा होती. म्हणून माधुरीसाठी  वर शोधण्याचे काम त्यांनी सुरु केले होते. एकीकडे माधुरीला सिनेमांमध्ये काम करण्याची स्वप्न पडत होती तर दुसरीकडे तिचे आई- बाबा मात्र तिच्यासाठी  मुलं शोधत होते. याचदरम्यान, माधुरीच्या वडिलांनी  दिग्गज गायक सुरेश वाडकर यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला.

बॉलिवूडमध्ये सुरेश वाडकर हे तेव्हा नवोदित गायक म्हणून नावारुपास येत होते. माधुरीच्या आई- वडिलांना सुरेश यांना मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव पाठवला. पण सुरेश वाडकर यांनी या स्थळाला थेट नकार दिला. कारण काय तर  माधुरी फार सडपातळ असल्याचे कारण त्यांनी दिले होते. या नकाराने माधुरीच्या आई- वडिलांना प्रचंड दु:ख झाले होते. एक चांगले स्थळ हातचे गेले, असेच इतर आईवडिलांप्रमाणे त्यांना वाटत होते. पण या नकाराने माधुरीचा मात्र फायदा झाला.  कारण यानंतर तिच्या आई- वडिलांनी तिला सिनेमात काम करण्याची परवानगी  दिली

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com