टिक-टॉकचा युझरचा डांन्स पाहून ह्रितीकही झाला चकित; व्हिडिओ होत आहे व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । बॉलिवूडमध्ये ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या हृतिक रोशनच्या डांसचा संपूर्ण देश चाहता आहे. हृतिक सारखे परफेक्ट आणि स्मूथ डान्स मूव्हज करणे कदाचितच बॉलिवूडमध्ये कोणाला शक्य असेल. मात्र, दुसर्‍याची डान्स मूव्ह पाहून हृतिक चकित झाला. अलीकडेच हृतिक रोशनने आपल्या ट्विटर हँडलवरून एका टिक-टॉक यूजरचा डान्स व्हिडिओ रीट्वीट केला आहे.

व्हिडिओमध्ये एक मुलगा घराच्या छतावर हृतिकच्या गाण्यावर जबरदस्त एअर वॉक करताना दिसत आहे. २ मिनिटांच्या २० सेकंदाच्या या डान्स व्हिडिओमध्ये तो अनेक गाण्यांवर वेगवेगळ्या डान्स मूव्हज अतिशय सफाईने करताना दिसत आहे . या डान्स व्हिडिओवरून हृतिक इतका प्रभावित झाला की त्याने ट्विटरवर व्हिडिओ रिट्वीट करून लिहिले की, “मी पाहिलेली आतापर्यन्तची सर्वात स्मूथ एअरवॉक करणार, हा माणूस कोण आहे? “

 

व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण “बाबाजॅक्सन २०२०” या नावाने टिक-टॉक डान्स व्हिडिओ करत असून तुमच्या मार्गदर्शन आणि सहकार्याची त्याला गरज असं प्रणव महाजन नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने ह्रितीकला दिलेल्या रिप्लायमध्ये म्हटलं आहे.

 

 

Leave a Comment