बॉलिवुड

जॉन अब्राहमचा ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Untitled design
Untitled design

बॉलीवूड | बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार जॉन अब्राहमचा ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. १९७१ च्या युद्धातील एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जॉन अब्राहम वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय. या चित्रपटात जॉन १८-२० अशा वेगवेगळ्या रूपात दिसणार आहे. मौनी रॉय आणि जॅकी श्रॉफ यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

जॉनचा हा चित्रपट एका ख-या भारतीय गुप्तहेराच्या आयुष्यावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सैन्यात सामील होऊन या गुप्तहेराने भारतीय सैन्यासाठी काम केले होते. रॉबी गरेवाल यांनी ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ या चित्रपटाची पटकथा लिहिली. तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ हा चित्रपट येत्या ५ एप्रिलला रिलीज होतोय. आधी या चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूतचे नाव फायनल झाले होते. त्याच्यासोबतचे चित्रपटाचे पहिले पोस्टरही लॉन्च झाले होते. पण नंतर डेट्सच्या अडचणीमुळे ऐनवेळी सुशांतने या चित्रपटातून बाहेर पडला त्यामळे जॉनला संधी मिळाली.

रोमिओ अकबर वॉल्टर (रॉ)
इतर महत्वाचे –

आधी लगीन लोकसभेचं मग विधानसभेचं …

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

‘या’ मतदार संघातून प्रिया दत्त लोकसभा निवडणूक लढणार

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares