खळबळजनक! ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या

नांदेड । मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आशुतोषने नांदेड येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. टीव्ही 9 मराठीच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्ये मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेमुळे मयुरी देशमुखच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

आशुतोषने फेसबुरवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओतील व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो? याबाबत विश्लेषण करताना दिसत होती. मात्र, तरीही आशुतोषने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला, असा प्रश्न मयुरीच्या चाहत्यांना पडला आहे.

View this post on Instagram

❤️

A post shared by Mayuri Deshmukh FC (@mayurideshmukhfc) on

मयुरी देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती खुलता कळी खुलेना या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली. तसेच मयुरी लिखित व दिग्दर्शित नाटक ‘डिअर आजो’ला खूप लोकप्रियता मिळवली. तिचे तिसरे बादशहा हम हे नाटक सुरु होते. याशिवाय डॉ. प्रकाश बाबा आमटे, 31 दिवस या चित्रपटात तिने काम केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com