लोकप्रिय हरियाणवी डान्सर सपना चौधरी झाली आई, दिला गोंडस बाळाला जन्म; चाहत्यांना दिला सुखद धक्का!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । हरियाणाची लोकप्रिय गायिका आणि डान्सर सपना चौधरीची लोकप्रियता सर्वाधिक आहे. सपनाच्या गाण्यांची तिचे चाहते मनापासून वाट पाहत असतात. सपना चौधरी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. आता सध्या सपना चर्चेत आहे त्याचं कारण मात्र वेगळंच आहे. सपना चौधरी आता आई झाली आहे. माहितीनुसार तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिल आहे. तिची आणि मुलाची प्रकृती उत्तम आहे. Sapna Choudhary Baby

PHOTO | हरियाणवी क्वीन सपना चौधरी झाली आई, मुलाला दिला जन्म

याच वर्षी जानेवारी महिन्यात सपना चौधरीनं हरियाणवी गायक-कलाकार वीर साहूसोबत लग्न केलं होतं. सपना चौधरीने रविवारी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. तिचा नवरा वीर साहू (Veer Sahu)फेसबुकवरुन ही माहिती दिली. 2017 पासून वीर साहू आणि सपना रिलेशनमध्ये होते. वीर साहू एक सिंगर, कंपोजर, गीतकार आणि हरियाणी अॅक्टर आहे. त्याला बब्बू मान या नावानेही ओळखलं जातं. Sapna Choudhary Baby

PHOTO | हरियाणवी क्वीन सपना चौधरी झाली आई, मुलाला दिला जन्म

४ ऑक्टोबरला एका खासगी रूग्णालयात बाळाला जन्म दिला .सपना चौधरीने आपलं लग्न आणि प्रेग्नेसी दोन्ही गोष्टी सिक्रेट ठेवल्या. Sapna Choudhary Baby सपनाच्या या खासगी आयुष्यामुळे तिचे चाहते खूप मोठ्या धक्क्यात आहेत. कारण सपनाने कधीच आपल्या लग्नाचा आणि नंतर प्रेग्नेसीचा खुलासा केला नव्हता. सपनाने तिचं खासगी आयुष्य खूप सिक्रेट ठेवलं. वीरच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे हे लग्न खासगी ठेवण्यात आलंय. पण आता स्वतः वीरने हा आनंद शेअर केला आहे.

PHOTO | हरियाणवी क्वीन सपना चौधरी झाली आई, मुलाला दिला जन्म

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment