ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं निधन, मराठी मातीतील रांगडा गडी काळाच्या पडद्याआड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र | गावाकडची माणसं चित्रपटात दिसलं की एकदम भारी फीलिंग वाटतं. या माणसांचं बोलणंही इतकं सडेतोड आणि रांगडं असतं की चित्रपट किंवा मालिकांमध्ये असणारी त्यांची छोटी भूमिकादेखील कायमची लक्षात राहून जाते. वयाच्या साठीनंतर महत्त्वाच्या चित्रपटांत मिळालेल्या छोट्या भूमिका दमदारपणे करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या म्हातारबाबांचं म्हणजेच रामचंद्र धुमाळ यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं, ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांमार्फत देण्यात आली.

मराठी चित्रपट आणि हिंदी वेबसिरीज मधून त्यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. फँड्रीमधील जब्याचे आजोबा, सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडेचा बाप, सैराटमधील परशाचे आजोबा, ख्वाडामधील रांगडा मेंढपाळ, म्होरक्या चित्रपटातील मार्गदर्शक गावकरी अशा अनेक भूमिकांनी रामचंद्र धुमाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. माणसांत मिसळणारा माणूस अशी रामचंद्र धुमाळ यांची ख्याती होती. भूमिकेला न्याय देताना तरुणांना लाजवेल अशा प्रकारचं काम रामचंद्र धुमाळ यांनी केलं. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment