..म्हणून ट्रोलर्सनी #BoycottMirzapur2 ट्विटरवर ट्रेंड करत उघडली मोहीम

मुंबई । ट्विटरवर बऱ्याचदा आपल्याला न पटणाऱ्या मतांविरोधी त्याच्यावर बहिष्कार टाकरणारी ट्रोलर्सची जमात सक्रिय असते. ही ट्रोलर मंडळी विरोध म्हणून एखादी गोष्ट कधी ट्रेंडमध्ये आणतील याचा नेम नाही. याची अनेक उदाहरणं आजवर पाहायला मिळाली आहेत. यातच भर पडत आहे ती म्हणजे ट्विटरवर ट्रेंड करणाऱ्या एका अशा हॅशटॅगची ज्यामुळं सध्या ‘मिर्झापूर२’ या बहुचर्चित वेब सीरिजला वादाची किनार मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

साधारण दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘मिर्झापूर’ या वेब सीरजच्या दुसऱ्या पर्वाची नुकतीच घोषणा करण्यात आली. तो नेमका प्रदर्शित कधी होणार याबाबतचीही माहिती देण्यात आली. ज्यानंतर काही प्रेक्षकांनी याबाबत उत्सुकता आणि कुतूहलाची भावना व्यक्त केली. तर, काहींनी मात्र Mirzapur 2वर बंदी आणण्याचीच मागणी केली. ज्यामुळं ट्विटरवर #BoycottMirzapur2 ट्रेंड करु लागला.

वेब सीरिजला विरोध होण्याचं निमित्त ठरलं ते म्हणजे मिर्झआपूरमधून झळकणाऱ्या अभिनेता अली फजल याचं एक ट्विट. २०१९ मध्ये अलीनं सीएए आणि एनआरसी आंदोलनांसंबंधी काही ट्विट केले होते. अली फझलंची सीएए आणि एनआरसी आंदोलनांसंबंधी भूमिका ट्विटरवरील एका गटाला रुचली नसून त्यांनी थेट अली फझलंला विरोध म्हणून #BoycottMirzapur2 ट्रेंड करायला सुरुवात केली. परिणामी त्याच्या आगामी वेब सीरिजला विरोध करण्यास सुरुवात झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com