संजुबाबा, तुम्ही लवकर बरे व्हाल! संजय दत्तच्या कॅन्सर निदानानंतर युवराज सिंगची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भारताचा जिगरबाज खेळाडू युवराज सिंग याने काही वर्षांपूर्वी कॅन्सरवर मात करत जीवनात यशस्वी कमबॅक केलं होतं. केमोथेरपी उपचार घेऊन बऱ्या झालेल्या, आणि पुन्हा खेळाच्या मैदानात उतरलेल्या युवराज सिंगचं कौतुक त्यावेळी सर्वांनीच केलं होतं. आता मात्र अशा आजारातून बाहेर पडण्यासाठी मित्राला धीर देण्याची वेळ युवराज सिंगवर आली आहे. बॉलिवूडचा डॅशिंग आणि बिनधास्त अभिनेता संजय दत्त याला कॅन्सर झाल्याचं निदान मंगळवारी झालं. संजय दत्तला फुफ्फुसांचा तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर असून त्याच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुढील उपचारांसाठी संजय दत्तला अमेरिकेला हलवण्यात येणार असून संजय दत्तच्या उत्तम आरोग्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु झाल्या आहेत. युवराज सिंगनेही संजुबाबा, तुम्ही लवकर बरे व्हाल असा संदेश ट्विटरवर दिला आहे. हा तुमच्या आयुष्यातील कठीण काळ असला तरी तुम्ही त्यातून बाहेर पडाल असा विश्वास युवराजने दिला आहे.

संजय दत्तच्या वादग्रस्त जीवनात गुन्हेगारीनंतर आजारपणाने डोकं वर काढलं असून छातीत दुखू लागल्याने त्याला 3 दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र सध्या तो कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराच्या विळख्यात सापडला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment