Friday, March 24, 2023

नोरा फतेहीकडून बोटीवर भन्नाट अरबी डान्स करत वाढदिवस साजरा; लगावले एकामागून एक ठुमके

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडची प्रसिद्ध डान्सर व डान्सिंग दिवा नोरा फतेही तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी आणि नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. तिची कंबरेतील डान्समधील स्टेप आजही अनेकांना भुरळ घालते. अलीकडेच नोराने तिचा वाढदिवस साजरा केला. आपल्या मैत्रिणीसोबत समृद्रात बोटीवर नोराने भन्नाट अरबी डान्स करत एंजॉय केला. तिने व्हिडीओ तिच्या इंट्राग्रामवर शेअरही केला आहे.

नोराचे आज असंख्य चाहते आहे. तिच्या तेरा नशा या गाण्याने अनेकांना अक्षरशा वेड लावले आहे. नोराने मुक्ताचा आपला 31 वा वाढदिवस साजरा केला. तिने वाढदिवसादिवशी तिच्या मित्रांसोबत खूप मौज-मस्ती केली. तिने बोटीवर जाऊन एक डान्सही केला. आणि त्यानंतर तिने तो तिच्या इंट्राग्राम अकाउंटवर शेअरही केला. त्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

नोराने आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईची निवड केली. मग ती तिने मैत्रिणींना घेऊन थेट दुबई गाठले. डान्स करताना तीने कलरफुल फ्लॉवर प्रिंट स्कर्ट आणि टॉप घातलेला होता. नोराने बोटीवरील यॉटवर उभी राहत अरबी डान्स केला. नोराने व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो चाहत्यांना देखील खूप आवडत आहे.