विस्तारा विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; प्रवाशांमध्ये भीतीच्या वातावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शुक्रवारी दिल्लीहून श्रीनगरला निघालेल्या विस्तारा विमानात (Vistara Flight) बॉम्बची धमकी मिळाली होती. या विमानात 177 लोक आणि एक लहान मूल प्रवास करत होते. ही धमकी मिळताच विमान कंपनी आणि सुरक्षा दलांनी यावर तातडीने कारवाई केली. यानंतर फ्लाइट UK-611 ला दुपारी ठीक 12:10 वाजता श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. मात्र या प्रकारामुळे सुरक्षा दलात गोंधळ उडाला. तसेच, प्रवाशांमध्ये ही भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहिला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, “विस्तारा फ्लाइट UK611 नवी दिल्लीहून येत होती. याचवेळी एअर ट्रॅफिक कंट्रोल श्रीनगरला एक धमकीचा फोन आला. ज्यात विस्तारा UK611 विमानाला बॉम्बे उडवण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. या धमकी नंतर ताबडतोब विमान श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. पुढे विमानातील सर्व प्रवाशांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यानंतर या विमानाची एका निर्जन स्थळी नेऊन तपासणी करण्यात आली. मात्र विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

दरम्यान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) तात्काळ तपासणी केल्यानंतर या विमानामध्ये कोणताही बॉम्ब सापडला नाही. ज्यामुळे काही वेळातच उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली. आता पोलीस यंत्रणा हा फोन नेमका कुठून आला होता आणि कोणी केला होता याचा शोध घेत आहे.