Bomb Threat | इंडिगो फ्लाईटमध्ये मिळाली बॉम्ब असल्याची धमकी; प्रवाशांनी घाबरून खिडकीतूनच मारल्या उड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bomb Threat | दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे या प्रवासी विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आलेली होती. त्यानंतर या विमानाला तपासणीसाठी आयसोलेशन बेमध्ये देखील पाठवण्यात आलेले होते. विमान सुरक्षा आणि फॉर्म निकामी करणारे पथक सध्या या ठिकाणी आहे. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे.

हे विमान पहाटे साडेपाच वाजता दिल्लीहून (Bomb Threat) वाराणसीला जाणार होते. याच वेळी या फ्लाईडमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून देखील बाहेर काढण्यात आलेले आहे. या ठिकाणी सर्व प्रवासी सुरक्षित आहे. त्यानंतर विमानाची तपासणी देखील केली जात.

विमानामध्ये बॉम्ब (Bomb Threat) असल्याची धमकी मिळाल्यानंतर इंडिगोच्या क्रूने अलर्ट चालू केला. आणि प्रवाशांना विमानातून उतरण्याची विनंती केली. प्रवाशांना ही माहिती समजताच, सगळे प्रवासी खूप घाबरले आणि काही प्रवासी आपत्कालीन गेटमधून, तर काही प्रवाशांनी थेट फ्लाईटच्या खिडकीतून खाली उड्या मारायला सुरुवात केली. याबाबतचे व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E2211 ला दिल्ली विमानतळावर बॉम्बची धमकी देण्यात आलेली होती. त्यानंतर सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन देखील करण्यात आलेले. आणि विमान सुरक्षा एजन्सीच्या मार्गदर्शक सूचनानुसार विमान दूरच्या खाडीत नेण्यात आले. आणि प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने बाहेर काढण्यात आले.

पीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दिली विमानतळावर इंडिगो फ्लाईट 6E2211 यांच्यामध्ये बॉम्ब असा शब्द लिहिलेला टिशू पेपर सापडला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी तपासणी सुरुवात केली.