हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान कर्नाटक राजभवनामध्ये धमकीचा फोन आला होता. याच फोनवरून एका अज्ञात व्यक्तीने राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सध्या या धमकीला गंभीर्याने घेऊन पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. तसेच, या धमकीनंतर राजभवनात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी ठीक रात्री साडे अकराच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीन कर्नाटक राजभवनात फोन केला होता. या फोनद्वारे त्याने राजभवनाला उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. यानंतर लगेच याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला देण्यात आली. ज्यामुळे आता कर्नाटक पोलीस हा फोन कोणी केला? यामागील कारण काय? याचा तपास घेत आहेत. अद्याप पोलिसांच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही एक अलर्ट कॉल करण्यात आला होता. यात राजभवनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर लगेच एनआयएने बंगळुरु पोलिसांना सतर्क केले. पोलिसांनी राजभवन आणि आजूबाजूच्या परिसराची तपासणी केली. परंतु त्यांना काहीही संशयास्पद आढळून आले नाही. तरी देखील पोलीस खबरदारी म्हणून या सर्व घटनेचा तपास करीत आहेत. तसेच, याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.