Bombay High Court Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. आजपर्यंत आम्ही दिलेला नोकरीच्या संधीमधून अनेक लोकांना नोकरी देखील लागलेली आहे. आज आम्ही मुंबई उच्च न्यायालया (Bombay High Court Bharti 2024) अंतर्गत एक भरती घेऊन आलेलो आहोत. या भरती अंतर्गत आता जिल्हा न्यायाधीश या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 28 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 26 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव | Bombay High Court Bharti 2024
या भरती अंतर्गत जिल्हा न्यायाधीश या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त पदसंख्या
जिल्हा न्यायाधीश या पदाच्या एकूण 28 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी अर्ज मागेविण्यात आलेले आहेत.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 35 ते 45 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
26 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
वेतनश्रेणी
या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला एक लाख 1,44,840 ते 1 लाख 94 हजार 660 रुपये एवढा पगार मिळेल.
अर्ज कसा करावा? | Bombay High Court Bharti 2024
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
- 26 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.