Bombay High Court Recruitment 2025: बॉम्बे उच्च न्यायालयात कायदा लिपिक पदासाठी मोठी भरती ; असा करा अर्ज

Bombay High Court Recruitment 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bombay High Court Recruitment 2025 – ज्या विद्यार्थांनी कायद्याचे शिक्षण (Law) पूर्ण केले आहे , त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “कायदा लिपिक” पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून , या पदासाठी 64 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हि सुवर्णसंधी ठरणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून , अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2025 आहे. तर चला या जाहिरातीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘कायदा लिपिक’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Bombay High Court Recruitment 2025) –

या पदासाठी एकूण 64 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा (Bombay High Court Recruitment 2025)

उमेदवारांना 21-30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतनश्रेणी –

या पदासाठी उमेदवारांना रु. 65,000/- दर महिना वेतन असणार आहे.

नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 29 जानेवारी 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, बॉम्बे, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी.टी. हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई –400001

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी CLICK करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

हे पण वाचा : राज्यात १५ हजार शिक्षकांची भरती; जानेवारी महिन्यात होणार जाहिरात प्रसिद्ध