Sunday, April 2, 2023

मंत्री शंभूराज देसाईंचे सुपुत्र झाले लेखक

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
एखाद्या शेतकऱ्याचं पोरग शेतकरीच होतं तर आमदारच पोरग आमदार, असं म्हटलं जात. मात्र, एखाद्या मंत्र्यांचं पोरग लेखक झालं आहे. उत्पादन शुल्क मंत्री, आमदार शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई यांनी नुकतेच ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. त्यांनी राजकारणाबरोबरच साहित्य क्षेत्रातील आपली लिखाणाची आवड जपली आहे. त्यांनी लिहलेल्या पुस्तकाचे मुंबईत विधानभवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून यशराज देसाई लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून यशस्वीपणे काम पाहत आहेत. त्यांच्यातील अभ्यासू व विचारशील नेतृत्वाची ओळख पाटण तालुक्यास झाली आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी लिहिलेले ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ हे पुस्तक माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जीवनाकडे पाहण्याच्या त्यांच्या अनोख्या सम्यक दृष्टीचा परिचय करून देणारे आहे.

- Advertisement -

पुस्तक प्रकाशनास राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार अनिल बाबर, बालाजी कल्याणकर, महेंद्र दळवी, भिमराव तापकीर यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता आदी उपस्थित होते.

पुस्तकात नेमके काय आहे?

मोबाइल, त्यावरील समाजमाध्यमे, त्यावरून लिखित तसेच ऑडिओ-व्हिडीओ स्वरूपात होणारा माहितीचा प्रचंड मारा यांनी एक आभासी जग तयार झाले आहे. आता प्रत्येक व्यक्ती हे आभासी जग आणि वास्तव जग असे दुहेरी जीवन जगताना दिसते. यात माणसाच्या खऱ्या भावभावना, त्याचे श्रेयस, त्याच्या इच्छा-आकांक्षा, मानवी नाती या साऱ्यांपुढे डिजिटल आव्हान उभे राहिले आहे. या आव्हानाला सामोरे जाताना, आभासी आणि वास्तव जगातला तोल, बॅलन्स कसा सांभाळायचा, याचे तात्त्विक चिंतन ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या पुस्तकात मांडले आहे.